जळगाव शहरात तरुणाचा खून

On: August 18, 2025 1:04 PM

जळगाव : जळगाव शहरातील कोंबडी बाजार परिसरातील महावितरण कार्यालय परिसरात आज पहाटे तिन वाजता तरुणाचा धारदार शस्त्राने खून झाल्याची घटना घडली. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. विशाल उर्फ विक्की रमेश मोची असे धारदार शस्त्राने खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. मारेकरी दोन ते तिन होते असे मयत तरुणाचे वडील रमेश शामलाल मोची यांनी माध्यमांसमोर बोलतांना सांगितले आहे.

रात्रीच्या वेळी अचानक विज गेल्यामुळे विशाल मोची याने महावितरण कार्यालयाला फोन लावला. मात्र पलीकडून कुणीही फोन उचलला नाही. त्यामुळे काकांच्या घरी गेलेल्या विशाल मोची याने त्याचा चुलत भाऊ आकाश मोची आणि मित्र राहुल भालेराव यांच्यासह महावितरण कार्यालय गाठले. त्याचवेळी त्यांच्या मागावर असलेल्या दोघा तिघांनी धारदार शस्त्राने विशालवर धारदार शस्त्राने हल्ला केला. त्यात तो ठार झाला.

मयत विशालचे शव विच्छेदन करण्याकामी त्याचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणले गेले. त्यावेळी आपला कुणासोबत वाद नव्हता, तरी देखील आपल्या मुलाची हत्या का करण्यात आली हे माहिती नसल्याचे रमेश मोची यांनी म्हटले आहे. तथापी मारेकरी अटक झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे त्यांनी म्हटले. अधिक तपास सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment