एलसीबी, मुक्ताईनगर पोलिस व अन्न औषध प्रशासनाची गुटखा वाहतुकीवर कारवाई

On: September 3, 2025 8:52 PM

जळगाव : जळगाव एलसीबी, मुक्ताईनगर पोलिस आणि अन्न औषध प्रशासनाच्या पथकाने मानवी आरोग्यास घातक असलेल्या गुटख्याची वाहतुक करणा-या दोघांविरुद्ध कारवाई केली आहे. गुटखा वाहतुक करणा-या वाहनासह एकुण 1 कोटी 2 लाख 33 हजार 460 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आशिष राजकुमार जयस्वाल (रा. ग्राम भमोरी, वार्ड नं. १४ देवास, मध्यप्रदेश) आणि आशिफ खान बुल्ला खान (रा. शिवशक्ती नगर, दत्तवाडी, नागपुर) अशी मुक्ताईनगर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

एलसीबीचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड  यांच्या पथकातील पोलिस उप निरीक्षक  सोपान गोरे, पोहेकॉ सलीम तडवी, पोकॉ छगन तायडे, पोकॉ रतन गिते, मयुर निकम, चापोहेकॉ भरत पाटील, मुक्ताईनगर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक आशिष अडसुळ, त्यांचे सहकारी सहायक पोलिस निरीक्षक जयेश पाटील, पोकॉ रवी धनगर, संदीप धनगर, चेतन महाजन व अन्न औषध प्रशासनाचे पथक आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.   

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment