यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) – जन्मदात्या पित्याची लाथा बुक्क्यांसह फावड्याच्या दांड्याने केलेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याच्या आरोपाखाली तरुणास अटक करण्यात आली आहे. आदर्श कांबळे असे अटक करण्यात आलेल्या संशयित तरुणाचे तर पुंडलिक दामोजी कांबळे असे मयत पित्याचे नाव आहे. यवतमाळ जिल्ह्याच्या घाटंजी तालुक्यातील येरंडगांव येथील घटनेप्रकरणी पारवा पोलीस स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मयत पुंडलिक दामोजी कांबळे यांना मद्यपानाचे व्यसन जडले होते. त्यातून घरात वाद होत असत. या वादातून त्यांचा मुलगा आदर्श कांबळे याने त्यांना जबर मारहाण केली होती. २ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला. पारवा पोलीस स्टेशनला गु. र. नं. ५०६/२०२५ भारतीय न्याय संहिता १०३ (१) नुसार हा गुन्हा दाखल आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप नरसाळे करत आहेत.







