जळगाव : चोरी झालेल्या मोटारसायकलसह चोरट्यास जिल्हापेठ पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने जेरबंद केले आहे. विनेश चंपालाल बरडे असे जळगाव शहरातील डी मार्ट परिसरातून ताब्यात घेतलेल्या चोरट्याचे नाव आहे. मोटार सायकल चोरीचा गुन्हा जिल्हापेठ पोलिस स्टेशनला 31 ऑगस्ट रोजी नोंद करण्यात आला होता.
या चोरीच्या डी मार्ट परिसरातून ताब्यात घेण्यात आलेल्या विनेश बरडे याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. पोलिस कोठडी दरम्यान त्याच्याकडून चोरीची मोटार सायकल हस्तगत करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकुर यांच्या पथकातील हे.कॉ. महेश महाजन, नरेश सोनवणे, शरीफ शेख, तेजस मराठे, अमीतकुमार मराठे, प्रशांत सैदाणे, विकास पहुरकर, प्रशांत लाड आदींनी या तपासकामी सहभाग घेतला.







