जळगाव : घरगुती गॅस सिलेंडरचा काळा बाजार जळगाव एलसीबी पथकाने उघडकीस आणला आहे. या प्रकरणी धरणगाव पोलिस स्टेशनला अनिल शंकर सोनवणे (रा. बांभोरी ता.धरणगांव जि. जळगांव) आणि मोईन शेख युसुफ शेख (रा. तांबापुरा ता. जि. जळगांव) या दोघांविरुद्ध धरणगांव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घरगुती गॅस सिलेंडरचा अनधिकृत साठा धरणगाव पोलिस स्टेशन हद्दीत वाहनात भरला जात असल्याची माहिती एलसीबी पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांना 4 सप्टेबर रोजी समजली. त्या माहितीच्या आधारे पोलिस उप निरीक्षक सोपान गोरे, पोहेकॉ सलीम तडवी, पोकॉ छगन तायडे, पोकॉ रतन गिते, पोकॉ/ मयुर निकम यांनी टाकलेल्या छाप्यात 5 लाख 16 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.







