जळगाव : जळगाव धुळे महामार्गावर पारोळा नजीक करण्यात आलेल्या सापळा कारवाईत मोठ्या प्रमाणात अफुच्या बोंडांसह सुमारे अडीच लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक अशोक पवार आणि त्यांच्या सहका-यांनी केलेल्या या कारवाईत 13 लाख 17 हजार 472 रुपये किमतीच्या अफुच्या बोंडांनी भरलेली तेरा पोती, 2 लाख 55 हजार 470 रुपये याशिवाय दोन अवजड चारचाकी वाहने, वजन काटा असा एकुण 50 लाख 82 हजार 942 रुपये किमतीच्या मुद्देमालासह एकाला अटक करण्यात आली आहे. शैतानाराम मानाराम बिश्नोई (राजस्थान) यास अटक करण्यात आली आहे.
जळगाव ते पारोळा दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर म्हसवे गावानजीक असलेल्या श्री रामदेव राजस्थानी ढाबा येथे अफुच्या बोंडांची देवाणघेवाण होणार असल्याची गोपनीय माहिती पोलिस निरीक्षक अशोक पवार यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी आणी डिवायएसपी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा कारवाई करण्यात आली.
पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या पथकातील सपोनि योगेश महाजन, पोउपनि अमोल दुकळे, हे.कॉ डॉ. शरद तुकाराम पाटील, सुनिल कौतिक हाटकर, महेश रामराव पाटील, प्रविण पाटील, संजय पाटील, संदीप सातपुते, पोना निलेश साळूंखे, पोकॉ मिथुन पाटील, भुषण पाटील, अशिष गायकवाड, तुषार सोनवणे, अजय बाविस्कर, आकाश पाटील, अभिजीत पाटील, देवेंद्र घरवाढे, सुनिल पाटील, होमगार्ड गोपाल पाटील आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. हे.कॉ. डॉ. शरद पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दाखल गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक योगेश महाजन करत आहेत. अटकेतील शैतानाराम मानाराम बिश्नोई यास सात दिवस पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे.







