राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत ओवी पाटील व श्रद्धा इंगळे विजेत्या

On: September 16, 2025 8:20 AM

जळगाव दि. 15 प्रतिनिधी – स्व. डॉ. सच्चीदानंद मुनगंटीवार मेमोरियल महाराष्ट्र मिनी स्टेट सिलेक्शन बॅडमिंटन स्पर्धा- 2025 ही चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आली होती. दि.10 ते 14 सप्टेंबर दरम्यान झालेल्या राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत ओवी पाटील चाळीसगाव (जळगाव) व श्रद्धा इंगळे (कराड) या दोघींनी 13 वर्षा खालील दुहेरी गटात विजय प्राप्त केला. त्यांनी सेमी फायनल मध्ये हेजल जोशी व स्पृहा जोशी मुंबई उपनगर या खेळाडूंना 21-15 व 21-14 ने हरवत अंतिम सामन्यासाठी आपली जागा निश्चित केली.

अंतिम सामन्यामध्ये मायरा गोराडिया व कनक जलानी मुंबई यांचा 21-14 व 21-15 सरळ दोन सेट मध्ये पराभव करत विजय नोंदवला. त्यांना  सुवर्णपदक, ट्रॉफी, रोख रक्कम व प्रावीण्य प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. ओवी चे वडील अमोल पाटील हे चाळीसगाव येथील काकासाहेब पूर्णपात्रे शाळेत क्रिडा शिक्षक असून तेच तिचे प्रशिक्षक आहेत. ओवी पाटील व अमोल पाटील यांच्या भावी वाटचालीसाठी जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन व सचिव विनीत जोशी, जैन स्पोर्ट्स अकॅडमी चे क्रीडा समन्वयक अरविंद देशपांडे व प्रशिक्षक किशोर सिंह यांनी शुभेच्छा दिल्या. दरम्यान जळगाव रेल्वे स्टेशनवर जैन स्पोर्ट्स अकॅडमीच्या प्रशिक्षक दीपिका ठाकूर यांच्या सह महिला खेळाडूंनी ओवी चा सत्कार केला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment