बारा हजारांच्या लाचेत अडकले दोघे पोलीस कर्मचारी

On: September 24, 2025 8:06 PM

जळगाव – कॉम्प्रेसर मशिनच्या मदतीने एलपीजी गॅस वाहनात भरणा-या व्यावसायीकाकडून तडजोडीअंती बारा हजार रुपयांची लाच मागणा-या दोघा पोलिसांसह ती स्विकारणारा पंटर अशा तिघांविरुद्ध धुळे एसीबी पथकाने कारवाई केली आहे. तिघांविरुद्ध अमळनेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमोल राजेंद्र पाटील आणि जितेंद्र रमणलाल निकुंभे अशी दोघा पोलिसकर्मींची नावे आहेत. तसेच उमेश भटू बारी असे लाच स्विकारणा-या खासगी पंटरचे नाव आहे.

या कारवाईतील तक्रारदाराचे अमळनेर शहरात वाहनात एलपीजी गॅस भरुन देण्याचा व्यवसाय आहे. हा व्यवसाय विना कारवाई सुरळीत सुरु ठेवायचा असल्यास दरमहा पंधरा हजार रुपये हप्ता द्यावा लागेल अशी अट व मागणी अमोल पाटील व जितेंद्र निकुंभे या दोघा पोलिस कर्मचा-यांनी तक्रारदाराकडे केली होती. याप्रकरणी तक्रारदाराने धुळे एसीबीकडे लेखी तक्रार दिली होती. त्यानुसार पडताळणी अंती कारवाई करण्यात आली. त्यात तडजोडीअंती बारा हजार रुपये पंटरमार्फत स्विकारण्यात आले. लाच स्विकारणा-या खासगी इसमास रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment