अश्लिल चाळ्यासाठी सुरु असलेल्या चॅट अड्ड्यावर छापा

On: October 9, 2025 8:26 AM

जळगाव : कॉफी शॉपच्या आडून अश्लील चाळे सुरु असलेल्या चॅट अड्डा नावाच्या कॅफेवर रामानंद नगर पोलिसांच्या पथकाने छापेमारी केली. जळ्गाव शहरातील एम.जे.कॉलेज परिसरातील या चॅट अड्ड्यावरील छाप्यात तरुण तरुणींचे अश्लिल चाळे निदर्शनास आले. काही महिन्यापुर्वी याच परिसरात अशाच प्रकारची कारवाई करण्यात आली होती. तरीदेखील कॅफेच्या नावाखाली महाविद्यालयीन तरुण तरुणींना अश्लिल चाळे करु देण्यासाठी जागा उपलब्ध करुन देण्याचा गोरखधंदा सुरुच असल्याचे या छापा कारवाईच्य माध्यमातून स्पष्ट झाले आहे.

चॅट अड्डा नावाने कॅफे चालवणा-या मयुर धोंडु राठोड या तरुणाविरुद्ध रामानंद नगर पोलिस स्टेशनला गुना दाखल करण्यात आला आहे. या ठिकाणी पोलिसांना निरोधची पाकिटे आढळून आली. उपस्थित तरुण तरुणींना समज देऊन सोडून देण्यात आले. पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे, पोहेकॉ जितेंद्र राजपूत, जितेंद्र राठोड, सुधाकर अंभोरे, मनोज सुरवाडे, रेवानंद साळुंखे, हेमंत कळसकर, विनोद सूर्यवंशी व योगेश बारी आदींनी सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment