जळगाव जिल्हा पोलिस दलाची कमांड येणार मुंडे यांच्याकडे

On: September 18, 2020 7:42 AM

जळगाव : महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने राज्यातील काही आयपीएस अधिका-यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. त्यात पोलिस अधिक्षक व पोलिस उपायुक्त दर्जाच्या अधिका-यांच्या पदस्थापना करण्यात आल्या आहेत.

जळगावचे विद्यमान पोलिस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले यांची बदली झाली असून त्यांच्या जागी रत्नागिरी येथून प्रविण मुंडे येत आहेत. पोलिस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले यांची बदली झाली असली तरी त्यांना नियुक्तीचे ठिकाण अद्याप देण्यात आलेले नाही. त्यांच्यासह इतर काही अधिका-यांच्या पद स्थापनेचे स्वतंत्र आदेश काढण्यात येणार आहेत.

जळगाव येथे नव्याने बदलून येत असलेले पोलिस अधिक्षक प्रविण मुंडे हे शिस्तप्रिय आहेत. रत्नागिरी येथे त्यांची कामगीरी उत्कृष्ठ असल्याचे सांगितले जाते. प्रविण मुंडे यांच्या जागी मोहित कुमार यांची पदस्थापना होणार आहे. मोहित कुमार हे अहेरी गडचिरोली येथून बदलून येणार आहेत.

विश्व पानसरे यांची नियुक्ती गोंदीया येथे पोलिस अधिक्षक पदावर होणार आहे. विश्व पानसरे यांनी यापुर्वी भुसावळ येथे पोलिस उप अधिक्षक तर धुळे येथे अतिरिक्त पोलिस अधिक्षक पदाचा कार्यभार सांभाळलेला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment