जळगाव जिल्ह्याच्या लाचखोरीत महसुल विभाग अव्वल स्थानी

On: October 28, 2025 5:02 PM

जळगाव : महाराष्ट्र राज्यात दरवर्षी  लाचलुचपत विभागाच्या वतीने “दक्षता जनजागृती सप्ताह” आयोजीत केला जातो. 27 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर या कालावधीत हा सप्ताह जळगाव कार्यालयात देखील आयोजीत करण्यात आला आहे. “सत्यनिष्ठेचा संस्कृतीच्या माध्यमातून राष्ट्र समृद्धी” ही संकल्पना घेऊन विविध कार्यक्रमांचे आयोजन या निमीत्ताने करण्यात आले आहे.

महाराष्ट्र शासन निर्णयानुसार 27 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी अकरा वाजता लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जळगाव येथील कार्यालयात भ्रष्टाचार निर्मुलनाबाबत शपथ घेण्यात आली. तसेच राज्यपालांसह मुख्यमंत्र्यांनी या सप्ताहानिमित्त दिलेल्या संदेशाचे वाचन करण्यात आले. त्यानंतर पुढील कार्यक्रमांची सुरुवात करण्यात आली. जळगाव शहरातील प्रमुख ठिकाणी भ्रष्टाचार निर्मुलनाबाबत पोस्टर्स आणि होर्डींग्ज लावून जनजागृती करण्यात आली.

मागील पुर्ण वर्षात जळगाव विभागाने एकुण 37 कारवाया केल्या. चालू वर्षभरात आतापर्यंत एकुण 35 कारवाया करण्यात आल्या आहेत. जानेवारी 2025 ते आज 28 ऑक्टोबर अखेर करण्यात आलेल्या लाचखोरीच्या एकुण 35 कारवायांमधे महसुल विभागाचा वर्ग 3 अव्वलस्थानी राहिला आहे. चालू वर्षभरात 28 ऑक्टोबर अखेर करण्यात आलेल्या कारवाईत महसुल विभागाच्या लाचखोरीच्या एकुण सात कारवाया करण्यात आल्या आहेत. त्या पाठोपाठ महावितरण लाचखोरीच्या एकुण चार, पोलिस विभागाच्या चार, जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या तिन, जळगाव महानगरपालिकेच्या दोन, ग्रामपंचायत विभाग दोन, वन विभागाच्या दोन व सरपंच दोन अशा आकडेवारीत कारवायांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त्त खासगी इसम, जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभाग, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद पंचायत समिती, ग्रामसेवक, भुमी अभिलेख, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण विभाग, व महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ या विभागांच्या प्रत्येकी एक अशा लाचखोरीच्या एकुण 35 कारवाया करण्यात आल्या आहेत. यात एकुण 53 पुरुषांविरुद्ध तर तिन महिलांविरुद्ध या कारवाया झाल्या आहेत.

लाचखोरीबाबत कुणाला काही तक्रार करायची असल्यास पोलिस उप अधिक्षक योगेश ठाकुर यांच्या 9702433131 या मोबाईल क्रमांकावर अथवा 0257 2235477 या लँड लाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. याशिवाय 1064 या टोल फ्री क्रमांकावर देखील तक्रार करता येते. तसेच [email protected] या मेल वर देखील तक्रार करता येते.       

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment