मेष : डोक्यावरील ताण हलका ठेवून कामे पूर्ण करण्याचा पुरेपुर प्रयत्न करा. ब-याच दिवसांपासून राहिलेले लिखाण, वाचन पूर्ण होईल.
वृषभ : मुलांकडून आपणास आनंद मिळेल. जुनी येणी वसूल होतील. वरिष्ठांच्या मदतीने कठीण काम सोपे होईल.
मिथुन : घरगुती कामात व्यस्त रहाल. कार्यालयात नवीन कामे मिळतील. आपले कलागुण सिद्ध करण्याची उत्तम संधी समजावी.
कर्क : नवीन घर अथवा वाहन खरेदीचा विचार करत असल्यास योग्य काळ आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासात मेहनत करणे गरजेचे आहे.
सिंह : स्वतःच्या आत्मविश्वासावर श्रद्धा ठेवा. दिवस उत्तम राहील. कार्यक्षेत्रात आपले वर्चस्व कायम राहील.
कन्या : आपली वैचारिक बुद्धिमत्ता वाढीस लागेल. व्यापारी वर्गासाठी चांगला दिवस आहे. कार्यालयात एखादे महत्वाचे व जबाबदारीचे काम सोपवले जाण्याची शक्यता आहे.
तुळ : व्यवसायात काही अधिकार प्राप्त होईल. लहान मोठे प्रवास घडतील. दिवसाची सुरुवात साधारण असेल.
वृश्चिक : नोकरीत मनासारखे काम मिळेल. कोणताही निर्णय पटकन घेऊ नका. दिवसभरात काही समस्या उद्भवतील मात्र त्या सुटतील.
धनु : आत्मविश्वासपुर्वक काम करा. मनात संशयाला स्थान देवू नका. समाजात मान, सन्मान वाढेल. आपले मार्गदर्शन इतरांसाठी पुरक ठरेल.
मकर : गुंतवणुकीसाठी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. प्रलोभनांना अजिबात बळी पडू नका. दिवसाची सुरुवात उत्साहवर्धक राहील.
कुंभ : अति गोड पदार्थांचे सेवन टाळा. आरोग्याची विशेष खबरदारी घ्या. संसर्गजन्य आजारापासून बचाव हाक मोलाचा उपाय.
मीन : आर्थिक लाभाच्या संधी येण्याची शक्यता आहे. महत्त्वाची कागदपत्रे जपून ठेवावी. आवश्यक तेथे गोपनियता कायम असावी.