मुंबई आग्रा महामार्गावर दहा लाखाच्या बनावट नोटा जप्त 

On: October 30, 2025 6:49 PM

नाशिक – मालेगाव तालुका पोलिसांनी मुंबई आग्रा महामार्गावर पाचशे रुपये दराच्या दहा लाख रुपये किंमतीच्या दोन हजार बनावट नोटा दोघा परप्रांतीय तरुणांकडून हस्तगत केल्या आहेत. काही इसम बनावट नोटा विक्री करण्याच्या उद्देशाने मुंबई आग्रा महामार्गावर येणार असल्याची माहिती मालेगाव तालुका पोलीस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना समजली होती. पेट्रोलिंग दरम्यान ए वन सागर हॉटेल जवळ दोन संशयित तरुण पोलिस पथकाला आढळून आले. 

नाजीर अकरम मोहम्मद अय्युब अन्सारी आणि मोहम्मद जुबेर मोहम्मद अशरफ अन्सारी (दोघे रा. बुरहानपूर मध्य प्रदेश) अशी दोघांची नावे आहेत. दोघांच्या झडतीत त्यांच्या कब्जातून दहा लाख रुपये किमतीच्या उभे उभे खऱ्या वाटणाऱ्या बनावट नोटा तसेच दोन मोबाईल हँडसेट व एक बॅग असा दहा लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. 

अटकेतील दोघांविरुद्ध भारतीय चलन कायदा अन्वये मालेगाव तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालेगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रीती सावंजी, पोलीस उपनिरीक्षक तुषार भदाणे, हे कॉ अमोल शिंदे, प्रकाश बनकर, पोकॉ गणेश जाधव, मोरे आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तुषार भदाणे करत आहेत. 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment