वकिल महोदयांची एक लाख रुपयात फसवणूक 

On: November 2, 2025 2:29 PM

जळगाव : ट्रेडिंग मधील गुंतवणुकीच्या माध्यमातून नफ्याचे आमिष दाखवत यावल येथील वकिलाची एक लाख दहा हजार रुपयात फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी यावल पोलिस स्टेशनला संबंधित महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

यावल येथील पंचवटी भागातील गांधी चौक परिसरात राहणारे अँड. राजेश प्रभाकर गडे यांच्याशी तीन महिन्यापूर्वी अंकिता शर्मा असे नाव सांगणाऱ्या एका महिलेने संपर्क साधला. तिने ऑनलाइन ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर गुंतवणूक केल्यास अल्पावधीत जास्त परतावा मिळेल असे वकील महोदयांना आमिष दाखवले.

त्या अमिषाला बळी पडून अँड. गडे यांनी एक लाख दहा हजार रुपये ऑनलाइन ट्रान्सफर केले. त्यानंतर त्यांनी त्या महिलेसोबत कित्येकदा संपर्क साधला. मात्र ती महिला नॉट रिचेबल आणि तिचा ट्रेडिंग प्लॅटफॉर्म गायब झाला. अखेर अँड. राजेश गडे यांनी यावल पोलिस स्टेशनला तिच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. अधिक तपास सुरु आहे. 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment