जळगाव – काम करत असलेल्या होंडा शो रुम मधील कामगाराने तेथील दुचाकी चोरुन नेल्याचा प्रकार भुसावळ शहरात उघडकीस आला आहे. रत्नेश पुरुषोत्तम रोडे असे भुसावळ शहरात राहणा-या या चोरट्याचे नाव आहे.
विना क्रमांकाची मोटार सायकल बाळगणा-या रत्नेश रोडे यास त्याच्या संशयास्पद हालचालीवरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला ताब्यात घेत त्याची सखोल चौकशी केली असता त्याने आपला चोरीचा गुन्हा कबुल केला.
त्यास चोरीच्या मोटार सायकल सह ताब्यात घेत त्याच्याविरुद्ध भुसावळ शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. श्रेणी पोलिस उप निरीक्षक रवी नरवाडे, पो.हे.कॉ गोपाल गव्हाळे, उमाकांत पाटील, पो.ना. विकास सातदिवे, पो. कॉ प्रशांत परदेशी, राहुल वानखेडे आदींनी या तपासात सहभाग घेतला.






