जळगाव : चोरीच्या मोटार सायकलसह चोरट्यास पाचोरा पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या चार तासात जेरबंद केले आहे. भगवान लक्ष्मण पाटील असे पाचोरा तालुक्यातील पिंप्री खुर्द येथील चोरट्याचे नाव आहे. पाचोरा शहरातील जारगाव चोफुली परिसरातून 4 नोव्हेंबर रोजी भोज चिंचपुरे येथील रहिवासी असलेल्या मनोज जाधव यांची मोटार दुपारी दिड वाजता चोरीला गेली होती. या प्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला होता.
पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या पथकातील पोहेकॉ राहुल काशिनाथ शिंपी, पोकॉ योगेश सुरेश पाटील, शरद मांगो पाटील, पोकॉ गणेश प्रल्हाद कुवर, श्रीराम अनिल शिंपी यांनी सीसीटीव्ही फुटेजसह गुप्त बातमीदाराच्या मदतीने तपास सुरु केला. या तपासात कृष्णापुरी परिसरात संशयीत चोरटा फिरत असल्याचे आढळून आले. त्याला शिताफीने ताब्यात घेत त्याची सखोल चौकशी करण्यात आली. भगवान लक्ष्मण पाटील असे नाव असलेल्या या चोरट्याने आपला गुन्हा कबुल करत चोरीची मोटार सायकल काढून दिली. या गुन्हयाचा अधिक तपास पोहेकॉ राहुल काशिनाथ शिंपी करत आहेत.






