जळगाव – शहरातील निवृत्ती नगर परिसरातील सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणाऱ्या मनीषा प्रदीप चौधरी यांची प्रदेश तेली महासंघच्या जळगाव महिला महानगर अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. प्रदेश तेली महासंघाची बैठक नुकतीच नंदुरबार येथे महासंघाचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत सर्वानुमते मनीषा प्रदीप चौधरी यांची महिला महानगर अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
याप्रसंगी महिला जिल्हाध्यक्ष निर्मला चौधरी, नाशिक विभागीय युवक अध्यक्ष प्रशांत सुरळकर, विनोद चौधरी, सारिका चौधरी, योगिता चौधरी, स्वप्निल चौधरी, धनंजय चौधरी आदींसह समाजबांधव उपस्थित होते. मनीषा चौधरी यांच्या निवडीमुळे समाजातील अनेक मान्यवरांकडून त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत.








