जळगाव : वेश्या व्यवसाय चालवणा-या पती पत्नीविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमानुसार अडावद पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे. धानोरा येथील रहिवासी असलेल्या दाम्पत्याने पिडीत महिलेचा वापर करुन तिच्या इच्छेविरुद्ध हा व्यवसाय थाटला होता.
या अनुचित प्रकाराची माहिती समजल्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या पथकाने धानोरा या गावी घटनास्थळी जावून कारवाई केली. पिडीत महिलेच्या इच्छेविरुद्ध तिचा वापर करुन या दाम्पत्याने उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण केला होता. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ करत आहेत.






