मोटार सायकल चोर एलसीबीच्या जाळ्यात

On: September 18, 2020 8:27 PM

जळगाव : जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज जामनेर शहरातून चोरीच्या दुचाकीसह चोरट्यास अटक केली आहे. पुढील तपासकामी त्याला मुद्देमालासह जामनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. बापू रोहोम यांच्य पथकातील कर्मचारी सहायक फौजदार अशोक महाजन, पो.हे.कॉ.सुरज पाटील, पो.ना.युनुस शेख, पोलीस नाईक किशोर राठोड, पो.काँ. रणजित जाधव यांच्या पथकाने सदर कारवाई यशस्वी केली.

जामनेर पोलिस स्टेशनला दाखल भाग 05 गु.र.न. 244/2020 भा.द.वि. 379 मधील मोटर सायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे. आरोपी शेख मुस्तकीन शेख सलीम रा घरकुल बिल्डिंग जामनेर यास त्याच्या ताब्यातील चोरीच्या दुचाकीसह ताब्यात घेण्यात आले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment