जळगाव – स्थानिक गुन्हे शाखा आणि मुक्ताईनगर पोलिसांनी संयुक्तरीत्या केलेल्या कारवाईत शेतातील गांजाची मोठी लागवड उध्वस्त केली आहे. मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून मनोज नामदेव घटे (रा. मानेगाव, ता. मुक्ताईनगर) यास अटक करण्यात आली आहे.
341 किलो 500 ग्रॅम वजनाची तेवीस लाख बावीस हजार दोनशे रुपये किंमतीची गांजाची 51 हिरवी झाडे या कारवाईत जप्त करण्यात आली आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, पोहेकॉ सुनिल दामोदरे, रफिक शेख, प्रेमचंद सपकाळे, विनोद पाटील, सलीम तडवी, पोना श्रीकृष्ण देशमुख, पोकॉ छगन तायडे, रतन गिते, मयुर निकम, रविंद्र चौधरी, चालक पोकॉ भरत पाटील यांच्यासह मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आशिष अडसुळ यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश पाटील, पोउपनि निलेश गोसावी, पोहेकॉ चंद्रकांत बोदडे, पोना मोतीलाल बोरसे, पोकॉ चेतन महाजन, रविंद्र धनगर, दिपक ठाकरे, गोविंद पवार, श्रावण भिल, जितेंद्र महाजन आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.






