आजचे राशी भविष्य (19/09/2020)

मेष : आपल्या स्मरणशक्तीचा आज फायदा झालेला जाणवेल. दिवसाची सुरुवात चांगली होईल. धनलाभाचे योग जुळून येण्याची शक्यता आहे.

वृषभ : नवीन काही शिकण्यासाठी आपल्याला योग्य काळ आहे. स्वतःला कामात झोकून दिल्यास यश मिळेल.

मिथुन : एखाद्या महत्त्वाच्या कामाची अंमलबजावणी करण्यासाठी चांगला दिवस. आर्थिक व्यवहारांकडे लक्ष देण्याची गरज आहे.

कर्क : सरकारी योजनेतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. यश आणि प्रगतीचे मार्ग प्रशस्त होण्याची शक्यता आहे.

सिंह : सल्ला घेण्यासाठी लोक आपल्याकडे येतील. त्यांना योग्य ते मार्गदर्शन करा. विद्यार्थ्यांना अति शुभ काळ.

कन्या : मित्रांकडून योग्य तो लाभ होण्याची शक्यता आहे. नवीन लिखान व वाचन होईल. रचनात्मक कार्य करण्याकडे कल निर्माण होईल.

तुळ : दिवसभर उद्योगांमध्ये व्यस्त रहाल. समाजात प्रसिद्धी मिळेल. व्यापाऱ्यांना भागीदारीतून लाभाची शक्यता आहे.

वृश्चिक : लहान मोठे प्रवास घडण्याची शक्यता आहे. जुने ग्रंथ वाचनात येण्याची शक्यता आहे. विचारपूर्वक गुंतवणुक करा.

धनु : जे काम कराल ते मनापासून करा. इतरांच्या गोष्टीत अजिबात लक्ष घालू नका. मित्रांची साथ मोलाची ठरेल.

मकर : माहीत नसलेली कोणतीही जबाबदारी स्वतःहून घेऊ नका. महत्त्वाचे बदल होण्याचे योग आहेत.

कुंभ : नवीन कामासाठी एखादा संकल्प कराल. जोडीदाराची चांगली साथ मिळेल. संमिश्र घटनांचा दिवस आहे.

मीन : अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवावे लागेल. परदेशात काम करणाऱ्या व्यक्तींसाठी लाभदायक दिवस.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here