चोरीच्या 61 सिलेंडर सह चोरटा जेरबंद 

On: November 21, 2025 5:53 PM

जळगाव – सिलेंडर चोरी करणाऱ्या चोरट्यास त्याने चोरी केलेल्या 61 सिलेंडर आणि गुन्ह्यात वापरलेल्या आयशर वाहनासह जेरबंद करण्यात आले आहे. शेख फिरोज शेख याकुब (रा. नशिराबाद जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या या चोरट्याचे नाव आहे.

जळगाव एमआयडीसीतील भारत पेट्रोलियम भागात उभ्या असलेल्या ट्रक मधून 342 पैकी 61 सिलेंडरची चोरी झाली होती. या चोरी प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला होता. तपासाअंती शेख फिरोज या चोरट्यास सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. हा गुन्हा त्याने त्याचा साथीदार  सैय्यद मुश्ताक सैय्यद अशपाक (रा. उस्मानिया पार्क, जळगाव) याच्या मदतीने केला असल्याचे त्याने कबूल केले आहे. 

पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या पथकातील फौजदार राहुल तायडे, चंद्रकांत धनके, सहायक फौजदार विजयसिंग पाटील, हे कॉ गणेश शिरसाळे, प्रदीप चौधरी, गिरीश पाटील, प्रमोद लाडवंजारी, किरण चौधरी, पोकॉ नितीन ठाकुर, किरण पाटील, शशिकांत मराठे आदींनी या तपास कामी सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment