तरुणाच्या हत्येप्रकरणी एकास अटक 

On: December 15, 2025 7:52 AM

जळगाव – जळगाव तालुक्यातील निमखेडी येथील तरुणाच्या हत्येप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. सागर साहेबराव सोनवणे असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. 14 डिसेंबर रोजी रात्री निमखेडी येथे धारधार शस्त्राने डोक्यात वार करून सागरची हत्या करण्यात आली. या खूनाबाबत सर्व शक्यता पडताळून पाहिल्या जात आहे.

या खूनप्रकरणी तालुका पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून अन्य संशयितांच्या मागावर पोलिस पथक आहे. सागर सोनवणे याच्या डोक्यात धारधार शस्त्राने वार करुन त्याला जखमी अवस्थेत निमखेडी गावात फेकून देण्यात आले होते. नातेवाइकांनी त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी सागरला मयत घोषित केले. अधिक तपास सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment