बेपत्ता बालिकेचा मृतदेह आढळला विहिरीत 

On: December 16, 2025 8:23 PM

जळगाव – चाळीसगाव तालुक्यातील तरवाडे बुद्रुक या गावातील नऊ वर्षाच्या बेपत्ता झालेल्या धनश्री शिंदे या बालिकेचा मृतदेह नजीकच्या विहिरीत आढळून आल्याने परिसरात खळबळ माजली आहे. गेल्या पाच दिवसापासून धनश्री शिंदे ही बालिका बेपत्ता झाली होती. पोलीस प्रशासन या बालिकेचा शोध घेत होते. तिचे नातेवाईक हवालदील झाले होते. मात्र तिचा मृतदेह आढळून आल्याने गाव परिसरात शोककळा पसरली आहे.

धनश्री शिंदे ही बालिका शाळेतून घरी परत जात असताना ती अचानक बेपत्ता झाली होती. जिल्हा परिषद शाळेत चौथ्या वर्गात शिक्षण घेणारी धनश्री सायंकाळी 4 वाजून 55 मिनिटांनी ग्रामपंचायत कार्यालयाच्या बाजूने जाताना सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसून आली होती. शोध मोहिमे दरम्यान गावाबाहेरच्या रस्त्यावर धनश्रीचे शालेय दप्तर आढळून आले. या घटनेचा अधिक तपास सुरु आहे. 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment