दहा हजाराच्या लाच प्रकरणी एक्साईज निरीक्षकासह पंटर जाळ्यात 

On: December 18, 2025 1:52 PM

जळगाव – दारुबंदी कायद्यानुसार कारवाई टाळण्यासाठी दहा हजाराची लाच घेतांना राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दुय्यम निरीक्षक एसीबीच्या कारवाईत सापडला. विजय भास्कर पाटील असे या लाचखोर निरीक्षकाचे नाव आहे. त्याच्यासह खाजगी इसम भास्कर रमेश चंदनकर अशा दोघांविरुद्ध रावेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यातील तक्रारदाराच्या वडिलांविरुद्ध यापूर्वी  दारुबंदी कायदयान्वये कारवाई झालेली आहे. त्यानंतर दारूबंदी कायदयाचे कलम 93 प्रमाणे कारवाई न करण्यासाठी तसेच दारूचा धंदा यापुढेही चालु ठेवायचा असल्यास दरमहा  पंधराशे रुपयाप्रमाणे बारा महिन्यांचे एकुण अठरा हजार रुपये लाचेची मागणी केली होती. त्यापैकी पहिला हप्ता म्हणुन दहा हजार रूपये लाचेची मागणी केली. 

लाचेची रक्कम खासगी इसम चालक भास्कर रमेश चंदनकर (खाजगी इसम) यांच्यासमक्ष स्विकारली. एसीबीचे निरीक्षक हेमंत नागरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दोघांविरुद्ध रावेर पोलिस स्टेशनला भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment