पाच सहायक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या

On: December 27, 2025 12:18 PM

जळगाव : जळगाव पोलिस दलातील पाच सहायक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्याबाबतचे आदेश पोलिस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी काढले आहेत.

वाहतुक शाखेच्या सहायक पोलिस निरीक्षक योगिता नारखेडे यांची नशिराबाद पोलिस स्टेशनला प्रभारीपदी नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्या जागी निंभोरा पोलिस स्टेशनचे स.पो.नि. हरीदास बोचरे यांची नेमणूक करण्यात आली आहे. निंभोरा पोलिस स्टेशनला स.पो.नि. बोचरे यांच्या जागी रावेर येथील स.पो.नि. मिरा देशमुख यांची नेमणूक करण्यात आली आहे. कासोदा पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक निलेश राजपूत यांची पोलिस अधीक्षक कर्यालयात रीडर म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. निलेश राजपूत यांच्या जागी रीडर श्रीकांत पाटील यांची नेमणूक करण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment