जळगाव : सलग तिन मुली झाल्यानंतर चौथ्या वेळेस देखील मुलगीच झाल्याने संतप्त जन्मदात्याने नवजात बालिकेच्या डोक्यात लाकडी पाट घालून तिची हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार जामनेर तालुक्यात घडला आहे. आईच्या हातातून नवजात बालिका पडून ठार झाल्याचा बनाव वैद्यकीय अहवालातून उघड झाला.
जामनेर तालुक्यातील मोराळ येथील रहिवासी कृष्णा लालचंद राठोड व राधिका राठोड या दाम्पत्याला सलग तिन मुली झाल्या. प्रत्येक वेळी आपल्याला मुलगा होईल अशी आशा या दाम्पत्याला होती. मात्र प्रत्येकवेळी त्यांना मुलीच झाल्या. चौथ्या वेळी देखील मुलगीच झाल्याने संतप्त पित्याने हा प्रकार केला. दिनांक 13 डिसेंबर रोजी घडलेल्या या प्र्काराबाबत शंका उपस्थीत केली जात होती. गावक-यांकडून समजलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास केला असता सत्य बाहेर आले. वैद्यकीय आणि फॉरेन्सिक अहवाल तसेच परिवाराने दिलेल्या माहितीत तफावत आढळून आली.







