आजचे राशी भविष्य (26/1/2026) 

On: January 25, 2026 9:55 PM

आजचे राशी भविष्य (26/1/2026) 

मेष : मनात संभ्रम असल्यास निर्णय पुढे ढकला. महत्वाचे निर्णय घेण्यापुर्वी घरात चर्चा करा.

वृषभ : एखादा वाद संपुष्टात येण्याची शक्यता आहे. व्यापारात वृद्धीसाठी प्रयत्न आवश्यक आहेत. 

मिथुन : आहारावर नियंत्रण ठेवून योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. घरगुती कामात वेळ द्यावा लागेल. 

कर्क : काही प्राप्त केले तर काही गमवावे देखील लागू शकते. व्यवसायात चांगल्या लाभाची शक्यता. 

सिंह : आपण फसणार नाही याची काटेकोर काळजी घ्या. सारासार विचार करुनच निर्णय घ्या. 

कन्या : सामाजीक मान सन्मान मिळाल्याने मनोबल वाढेल. कौटूंबिक वातावरण उत्साही असेल. 

तुळ : मानसिक स्थैर्य कायम ठेवा. खर्चात वाढ होवून आर्थिक चिंता सतावण्याची शक्यता.

वृश्चिक : आपल्या निर्णय क्षमतेचा पूरेपूर उपयोग करा. दिवसाचा उत्तरार्ध अनुकूल राहील.

धनु : व्यवसायात प्रगती होईल. वृद्धी होईल. सामाजिक कार्यात व्यत्यय येवू शकतो. 

मकर : न्यायालयीन कामे मार्गी लागण्याची शक्यता. भाग्याची ब-यापैकी साथ लाभेल. 

कुंभ : मध्यम फलदायी दिवस राहील. एखादी शुभवार्ता कानी पडेल. आरोग्याची काळजी आवश्यक.  

मीन : मानसिक संतुलन कायम ठेवून कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न करा. बचतीच्या योजना आखा. 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment