चोरीच्या तिन मोटारसायकली चोरट्यांकडून जप्त

On: January 30, 2026 8:06 PM

जळगाव : चोरीच्या तिन मोटार सायकली दोघा चोरट्यांकडून जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. जामनेर पोलिस स्टेशनला दाखल असलेले मोटार सायकल चोरीचे दोन व भुसावळ शहर पोलिस स्टेशनला दाखल एक असे एकुण तिन गुन्हे उघडकीस आले आहेत. अनुराग लक्ष्मण सुनगत व दर्शन बापु चव्हाण असे जामनेर येथील रहिवासी असलेल्या चोरट्यांची नावे आहेत.

आपल्या अजून एका साथीदारासह आपण मोटार सायकल चोरीचे गुन्हे केले असल्याचे अटकेतील दोघांनी कबुल केले आहे. अधिक तपासकामी चोरीच्या मोटार सायकलींसह दोघांना जामनेर पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या पथकातील पोलिस उपनिरीक्षक शरद बागल, ग्रेड पोलिस उपनिरीक्षक रवी नरवाडे, पो हे कॉ गोपाळ गव्हाडे, पो हे कॉ उमाकांत पाटील, पो ना विकास सातदिवे, पो कॉ प्रशांत परदेशी, पो कॉ राहुल वानखेडे यांच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment