गावठी कट्टा बाळगणारा जेरबंद

On: February 12, 2026 7:01 PM

जळगाव – गावठी कट्टा आणि तीन जिवंत काडतुस बाळगणाऱ्या तरुणास जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. शाहूनगर भागातील रहिवासी मोहम्मद साद अय्युब खान असे कट्ट्यासह अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. जळगाव शहरातील उस्मानिया पार्क परिसरातून त्याला ताब्यात घेण्यात आले. 

जळगाव शहर पोलीस स्टेशनला त्याच्याविरुद्ध गु.र.क्रं. ३७/२०२६ भारतीय हत्यार कायदा १९५९ कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कारवाईकामी त्याला जळगाव शहर पो.स्टे.च्या ताब्यात देण्यात आले आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या पथकातील पोलिस उप निरीक्षक शरद बागल, सहायक फौजदार अतुल वंजारी, पोहेकॉ विजय पाटील, अक्रम शेख, नितीन बावीस्कर, विलेश सोनवणे, किशोर पाटील, रविंद्र कापडणे यांच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला. पुढील तपास जळगाव शहर पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल सुनील पाटील करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment