जीआरएफ अन् वनिता हॉस्पिटलतर्फे मोफत आरोग्य तपासणी

On: February 24, 2026 6:49 PM

जळगाव : चोपडा तालुक्यातील वैजापूर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जळगावातील गांधी रिसर्च फाऊंडेशन (GRF) आणि वनिता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर घेण्यात आले होते. शिबिराचा लाभ 84 ग्रामस्थांनी घेतला. 

शिबिराचे उद्घाटन  वैजापूर ग्रुप ग्रामपंचायतचे लोकनियुक्त संरपच दत्तरसिंग सुभाष पावरा, उपसरपंच विद्याताई गुमान बारेला यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी वनिता हॉस्पिटलचे डॉ. उजौला मुंडे, डॉ. वैभव वाणी, निलेश पाटील, नावेद शेख उपस्थित होते. शिबिरात विविध तपासण्या करून औषध वाटप करण्यात आली. या उपक्रमात वैजापुर, मुळयावतार, खारयापाडा, शेणपाणी, अंबापाणी गावातील  ग्रामस्थांनी लाभ घेतला. डॉ.वैभव वाणी यांनी रुग्णांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक गांधी रिसर्च फौंडेशन जळगाव क्षेत्रिय अधिकारी चंद्रकांत चौधरी यांनी केले. सूत्रसंचालनाची वैभव आंबोरे यांनी केले. 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment