वसुलीची रक्कम लुटणारे सात जण गजाआड

On: February 25, 2026 9:28 PM

जळगाव : दोघा वसुली कर्मचा-यांच्या ताब्यातून मसाला विक्रीची रक्कम हिसकावून नेणा-या सात जणांच्या टोळीला रावेर पोलिस  स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने जेरबंद केले आहे. या टोळीचा मुख्य सुत्रधार फरार असून पोलिस पथक त्याच्या मागावर आहे. अटकेतील टोळीकडून 95 हजार रुपयांसह त्यांनी गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटार सायकली असा एकुण 3 लाख 50 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. फारुख शेख रईस, अत्ताउल्लाह खान दाउद खान, शेख सईद शेख कादर, शेख समीर शेख कलीम, राहील खान दाउद खान, रहेमान खान अय्युब खान व अक्रम खान इस्माईल खान (सर्व रा. बंडु चौक रावेर) अशी अटक करण्यात आलेल्या सातही जणांची नावे आहेत.

बुरहाणपुर येथील मसाला व्यावसायीक दिपक धर्मानी यांच्या दोघा कर्मचा-यांच्या ताब्यातील वसुलीची रक्कम आठ ते नऊ जणांच्या टोळीने हिसकावून नेली होती. 6 फेब्रुवारी रोजी रावेर पोलिस स्टेशन हद्दीतील आरटीओ चेक पोस्टनजीक रात्रीच्या अंधारात हा प्रकार घडला होता. पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जायस्वाल यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे सातही जणांना ताब्यात घेण्यात आले. सखोल चौकशीत ताब्यातील सातही जणांनी आपला गुन्हा कबुल केला. पोलिस पथक आपल्या मागावर असल्याचे लक्षात येताच  मुख्य सुत्रधार शेख हसन शेख अफजल (रा. रुस्तम चौक रावेर) हा पळून जाण्यात यशस्वी झाला.  

पो. नि. डॉ. विशाल जायस्वाल यांच्या पथकातील पोलिस उप निरीक्षक तुषार पाटील, पो.हे.कॉ सुनिल वंजारी, गुन्हे शोध पथकातील कल्पेश आमोदकर, श्रीकांत चव्हाण, प्रमोद पाटील, विशाल पाटील, सुकेश तडवी, विकारोद्दीन शेख, अतुल गाडीलोहार, गजानन बोणे, यांनी तपासकामी सहभाग घेतला. सायबर पोलिस स्टेशनचे गौरव पाटील, मिलींद जाधव यांनी तांत्रीक तपासकामी सहकार्य केले.

,

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment