हसन जमादार यांचे उल्लेखनीय कार्य

On: September 20, 2020 8:37 PM

हमीद तडवी याजकडून

रावेर : तालुक्यातील सातपुडा पायथ्याशी वसलेल्या लोहारा गावातील समाजसेवक,सामाजिक कार्यकर्ता म्हणुन ओळखले जाणारे हसन रुबाब जमादार यांनी लोहारा येथील सुकी नदीतील साफसफाई,स्वच्छता करण्याचा तीन दिवसीय उपक्रम हाती घेतला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,लोहारा येथील समाजसेवक हसन जमादार हे सदैव सामाजिक कार्यासाठी कोणतेही कार्य असो हसन जमादार यांचा प्रथम सहभाग सामाजिक,सार्वजनिक कार्यात नेहमी असतो. सध्यस्थितीत लोहारा येथील सुकी नदीला नेहमी पुर येतो. सुकी नदीचा पुल लहान अरुंद असल्याने या पुलाजवळ सातपुडा जंगलातुन वाहून आलेली झाडे-झुडपे या पुलाच्या पाईपांमधे अडकुन पडतात. त्यामुळे सुकी नदीचे पाणी हे पुलावरुन वाहते. पुलावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. परिसरातील जनतेला पुलावरील रहदारीचा खुप अडथळा निर्माण होतो. कुसूंबा व लोहारा गावासह अनेक गावांचा संपर्क त्यामुळे तुटतो. कधी-कधी पुराचे पाणी जास्त आल्यास या पुलावर गुरे-ढोरे व मानवी जिवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हा सर्व प्रकार लक्षात घेता समाजसेवक हसन जमादार यांनी सुकी नदीतील झाडाझुडपांची साफसफाई करण्याचा तिन दिवसांचा उपक्रम हाती घेतला आहे. त्यांच्या या कार्याचे आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी, गावातील प्रतिष्ठित नागरिक, सरपंच, महिला व गावकऱ्यांकडुन कौतुक केले जात आहे. सलग तीन दिवस हा साफसफाईचा उपक्रम सुरु राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

22 सप्टेंबर पर्यंत हसन जमादार हे स्वत: लक्ष घालून लोहारा येथील सुकी नदीतील साफसफाईचे काम करत आहेत. या प्रसंगी हसन जमादार यांच्या सोबत कादर तडवी, पिरखा तडवी, जुम्मा तडवी यांचे सहकार्य लाभत आहे. हसन जमादार यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment