गोमांस विक्री करणारे तिघे गजाआड

On: March 10, 2026 8:40 PM

जळगाव – गोवंशाची कत्तल करुन विक्री करणाऱ्या पिता – पुत्रासह एकुण तिघांना रावेर पोलिस स्टेशनच्या पथकाने गजाआड केले आहे. रावेर तालुक्यातील रसलपुर या गावात कुरेशी मोहल्ल्यात गोवंशाची कत्तल करुन गोमांस विक्री होत असल्याची गोपनीय माहिती रावेर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जायसवाल यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे शेख युसुफ शेख अय्युब कुरेशी व शेख सानिफ शेख युसुफ कुरेशी या पिता पुत्रास गोमांस विक्री करतांना ताब्यात घेत अटक करण्यात आली आहे. फरार झालेला शेख नईम शेख अय्युब कुरेशी याला देखील नंतर अटक करण्यात आली.

या कारवाईत एकुण 31 हजार रुपये किमतीचे अंदाजे 175 किलो मांस तसेच धारदार कोयते जप्त करण्यात आले आहेत. पो कॉ श्रीकांत चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रावेर पोलिस स्टेशनला महाराष्ट्र प्राणी सुधारणा अधिनियम व भारतीय न्याय संहीते नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पशुवैदयकीय अधिकारी डॉ. रंजीत पाटील यांच्या समक्ष गोमांसाचे नमुने घेवुन त्याची योग्यरित्या विल्हेवाट लावण्यात आली. पो.नि.डॉ विशाल जयस्वाल यांच्या पथकातील उप निरीक्षक मनोज महाजन, पो कॉ प्रमोद पाटील, विशाल पाटील, श्रीकांत चव्हाण, सुकेश तडवी, गजानन बोने, राहुल परदेशी, शुभम काळे यांनी या कारवाईत सहभाग घेतला. पुढील तपास पो.हे. कॉ. सिकंदर तडवी करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment