आजचे राशी भविष्य (21/09/2020)

मेष : कोणत्याही प्रकारे चुकीचा मार्ग अवलंबून नका. समाजासाठी आजवर केलेल्या शुभकार्यामुळे कीर्ती वाढेल.

वृषभ : मनात काही शंका असल्यास पाऊल उचलू नका. कामे धीराने व विचारपुर्वक घ्या. कार्यालयीन कामकाजातील वातावरण अनुकूल राहील.

मिथुन : कोर्टकचेरीची कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे. घरात एखादी नवीन खरेदी होईल. काही विधायक कामे हातून घडू शकतील.

कर्क : आपल्या तिक्ष्ण बुद्धीचा योग्य ठिकाणी उपयोग करा. हितशत्रूंपासून सावधगिरी बाळगा.

सिंह : दुर्जन लोक ओळण्यास शिका. आत्मविश्वास व मनोबल वाढीस लागण्याची शक्यता आहे. नातेसंबंध दृढ करणारा दिवस.

कन्या : वादाचे प्रसंग शक्यतोवर टाळाव्यात. टाळावेत. आपण आणि आपले काम एवढेच पाहणे योग्य राहील.

तुळ : एखाद्या हस्तक्षेपानंतर कार्य सिद्धीस जाण्याची शक्यता आहे. व्यवहारातील मुद्दे निकाली लागण्याची शक्यता आहे.

वृश्चिक : महत्वाचे काम करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. सकारात्मक विचार करा. व्यापारी वर्गासाठी चांगला दिवस आहे.

धनु : नोकरदारांना चांगला दिवस. कौटुंबिक समस्यांचा धैर्याने मार्ग काढू शकाल. विद्यार्थ्यांनी एकाग्रतेने अभ्यासात लक्ष देणे गरजेचे आहे.

मकर : जोडीदाराच्या समाधानासाठी पैसे खर्च होतील. व्यवसायात नवीन कामे मिळण्याची शक्यता आहे.

कुंभ : राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना एखादी नवीन संधी प्राप्त होण्याची शक्यता आहे. नवीन ओळखीतून फायदा होण्याची शक्यता आहे.

मीन : आपल्या बोलण्यात मृदुता ठेवल्यास फायदा होण्याची शक्यता. बुद्धीच्या बळावर हितशत्रूंना परास्त करु शकता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here