गावठी कट्टयासह दोघे जेरबंद

On: March 31, 2026 3:17 PM

जळगाव – गावठी कट्टयासह तीन जिवंत काडतुस बाळगणाऱ्या दोघांना एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने विमानतळ परिसरातून जेरबंद केले आहे. दिपक ठकुबा गुंजाळ व विठ्ठल रंगनाथ सोनवणे (दोघे रा.सिल्लोड, जि. छ.संभाजीनगर) अशी त्यांची नावे आहेत. पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना समजलेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. जळगाव शहरातील तांबापुरा भागात राहणाऱ्या अजय बिरजु गारुंगे याच्याकडून गावठी पिस्टल विकत घेतल्याची दोघांनी कबुली दिली. अजय गारुंगे हा फरार असून पोलिस पथक त्याच्या मागावर आहेत.

अटकेतील दोघांकडून त्यांनी गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल, एक मोबाईल, एक गावठी पिस्टल आणि तिन जिवंत काडतुस असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या पथकातील उप निरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके, पोहेकॉ किरण चौधरी, प्रमोद लाडवंजारी, गिरीश पाटील, पोकॉ विशाल कोळी, नितीन ठाकुर आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उप निरीक्षक चंद्रकांत धनके व पोकॉ चेतन पाटील करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment