एनसीबी कार्यालय असलेल्या इमारतीला आग

On: September 21, 2020 9:47 PM

मुंबई : बॅलार्ड इस्टेट येथील एनसीबीचे कार्यालय असलेल्या एक्सचेंज इमारतीला आज दुपारी आग लागली. अग्निशमन दलाच्या गाड्यांनी ही आग विझवण्याचा प्रयत्न केला. फोर्ट परिसरातील या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली. आगीचे वृत्त समजताच अग्निशमन दल व अ‍ॅम्ब्युलन्स, पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर एनसीबीचे कार्यालय आहे.

आज दुपारी आग लागलेल्या इमारतीत अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणी चौकशी सुरु आहे. या इमारतीत सुशांत सिंह प्रकरणातील ड्रग्ज संबंधी तपासासाठी रियासह अनेक जणांना चौकशीकामी बोलवण्यात आले होते. एनसीबीच्या तपास कामात या आगीमुळे अडचण निर्माण झाली आहे. या आगीत कुणी जखमी झाले नसल्याचे वृत्त आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment