हे.कॉ. नितीन बाविस्कर यांना पोलिस महासंचालक सन्मान चिन्ह

On: April 30, 2026 9:21 AM

जळगाव : जळगाव पोलिस दलातील हेड कॉन्स्टेबल नितीन बाविस्कर यांना पोलिस महासंचालक सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र जाहीर झाले आहे. उद्या 1 मे महाराष्ट्र दिनी त्यांना हे सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र सन्मानपुर्वक दिले जाणार आहे. जळगाव पोलिस दलातील एकुण 27 जणांना हे सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र दिले जाणार आहे. यात पोलिस नाईक ते सहायक फौजदार यांचा समावेश आहे. जळगाव पोलिस दलातर्फे एकुण 72 जणांचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. त्यापैकी एकुण 27 जणांना हा सन्मान दिला जात आहे.

महाराष्ट्र पोलीस दलामध्ये विविध प्रकारच्या प्रवर्गातील अधिकारी व कर्मचा-यांना त्यांनी केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल महाराष्ट्र दिनी मान्यवरांच्या हस्ते हा सन्मान दिला जातो. पोलिस महासंचालक सन्मान चिन्ह जाहीर झालेल्या सर्व अधिकारी व अंमलदारांचे पोलिस महासंचालक सदानंद दाते यांनी अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

जळगाव पोलिस दलातील सन्मान चिन्ह जाहीर झालेले सहायक फौजदार पुढील प्रमाणे आहेत – भरतसिंग प्रल्हाद पाटील, दिलीप मेघराज जाधव, शामकांत दिनकर सोनवणे, सलिम खान बशारत खान, मिनाक्षी दिलीप सावळे, सखाराम छबूराव सकट, अफजल युसुफ खान, विठ्ठल शंकर फुसे, रविंद्र सर्जेराव गायकवाड, अनिल भाऊराव चौधरी (चालक सहायक फौजदार), मो. सलिम शेख मुसा पिंजारी (चालक सहायक फौजदार).

पोलिस हवालदार पुढील प्रमाणे –  अशोक दौलत अहिरे, संदिप रमेश पाटील, किरण निंबालाल धमके, विद्या हरिलाल पाटील, विजय बळीराम नेरकर, संदिप भिकन पाटील, राहुल भिमराव सोनवणे, सुरज मधुकर पाटील, नितीन प्रकाश बाविस्कर, विजय गोरखनाथ पाटील, अकरम याकुब शेख, इरफान यासीन मलिक. पोलिस नाईक पुढील प्रमाणे – अश्विन साहेबराव हडपे, अतुल संतोष चौधरी, सचिन रमेश सोनवणे, संदिप अशोक नन्नवरे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment