जळगाव : अल्पवयीन मुलीस गर्भवती करणा-या तरुणास भडगाव पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेशी संबंधीत तरुणासह त्याची मैत्रीण अशा दोघांविरुद्ध भडगाव पोलिस स्टेशनला पोस्कोसह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अटकेतील संशयीताची एक मैत्रीण होती. त्या मैत्रीणीने त्याची व पिडीत मुलीची एकमेकांसोबत ओळख करुन दिली. तसेच त्या मैत्रीणीने तिच्या घरात दोघांना शरीरसुखासाठी जागा देखील उपलब्ध करुन दिली.
ओळखीचा गैरफायदा घेत तरुणाने त्याच्या मैत्रीणीच्या घरी पिडीतेसोबत शरीर संबंध प्रस्थापित केले. त्यातून ती गर्भवती झाली. पिडीत मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार भडगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फौजदार सुशिल सोनवणे अधिक तपास करत आहेत.






