आमदार कन्येच्या श्रीमुखात भडकवणाऱ्या सुरक्षा कर्मी विरुद्ध गुन्हा

On: May 17, 2026 8:59 AM

नाशिक – त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांना सिक्युरिटी गार्डकडून मारहाणीचा प्रकार अद्याप ताजा असतांना नाशिकच्या काळाराम मंदिरात असाच एक प्रकार घडला. महिला सुरक्षारक्षकाने आमदार कन्येच्या श्रीममुखात भडकावत शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

लातूर ग्रामीणच्या एका आमदारांची कन्या परिवारासह काळाराम मंदिरात आली होती. दुपारी आमदार कन्या मंदिराकडे जात असताना एका महिलेचा मुलगा, पती-पत्नीचे मोबाईलमध्ये फोटो काढत होता. इतर भाविकही त्याठिकाणी फोटो काढत होते. त्यावेळी संशयित महिला सुरक्षारक्षकाने महिलेच्या मुलाला फोटो काढण्यास मज्जाव केला.

आमदार कन्येने सुरक्षारक्षकाला समजवण्याचा प्रयत्न केला असता महिला सुरक्षारक्षकाने आमदार कन्येच्या श्रीमुखात भडकावत शिवीगाळ केली. घडलेला प्रकार आमदारांच्या परिवाराने आमदारांना कळवला. पंचवटी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संशयित महिला सुरक्षा रक्षकाला ताब्यात घेत अदखलपात्र गुन्हा दाखल केला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment