अनोळखी मृत पुरुषाच्या वारसाची ओळख पटवण्याचे आवाहन

On: May 18, 2026 9:12 AM

जळगाव – जळगाव शहर पोलिस स्टेशन हद्दीत शिवाजी नगर परिसरात आढळून आलेल्या एका अनोळखी मृत पुरुषाच्या वारसांची ओळख पटवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मयताची ओळख वारसांच्या माध्यमातून पटवण्याचे जळगाव शहर पोलिस करत आहेत.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 17 मे 2026 रोजी सकाळी सुमारे 9.30 वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील शिवाजी नगर भागातील उमिया सॉ मिल परिसरात एक इसम बेशुद्ध अवस्थेत मिळून आला.  संबंधित व्यक्तीस तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यास मृत घोषित केले.

या प्रकरणी जळगाव शहर पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली असून मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. मृत इसमाचे अंदाजे वय 45 वर्षे असून उंची सुमारे 5 फूट 5 इंच आहे. चेहरा गोल, डोळे पूर्णपणे उघडे असून तोंड अर्धवट उघडे असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मृताच्या वरच्या जबड्यातील समोरील एक दात पडलेला आहे.

मृत व्यक्तीच्या अंगात पांढऱ्या व लालसर रंगाचा चौकटीचा शर्ट, निळ्या रंगाची स्पोर्टी हाफ पँट तसेच तपकिरी रंगाची MACHO कंपनीची अंडरवेअर परिधान केलेली होती. या अनोळखी मृत इसमाबाबत कोणास माहिती असल्यास अथवा संबंधित व्यक्ती हरवल्याची नोंद कुठे करण्यात आली असल्यास नागरिकांनी जळगाव शहर पोलीस स्टेशनशी 0257-2229693 अथवा हे.कॉ. जितेंद्र तावडे यांच्याशी 7738341022 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment