जळगाव : खासगी क्षणांचे चित्रीकरण व्हायरल केल्याप्रकरणी अमळनेर शहर पोलिस ठाण्यात एका युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. प्राप्त माहितीनुसार नोव्हेंबर २०२५ मध्ये अमळनेर येथे एका राजकीय नेत्याची सभा होती. त्या सभेच्या कार्यक्रमाचे चित्रीकरण करण्यासाठी तरुणीणे त्या तरुणाला आपला मोबाईल दिला होता. त्या मोबाईलचा पासवर्ड त्या तरुणाला माहित झाला होता.
तरुणीच्या मोबाईलमधील तिच्या खासगी क्षणांचे चित्रीकरण तरुणाने आपल्या मोबाईलमधे करुन घेत त्या चित्रीकरणाचा त्याने गैरवापर केल्याचा आरोप आहे. काही दिवसांनी तरुणीच्या मोबाईलमधील खासगी क्षण सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याची माहिती तरुणीला समजली. हा सर्व गैरप्रकार त्या तरुणानेच केला असल्याचा तरुणीची खात्री झाली.
या प्रकरणी पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिस ठाण्यात तरुणाविरुद्ध आयटी अॅक्टसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरु आहे.




