अल्पवयीन मुलीचे अपहरण करणारे दोघे इटारसीतून ताब्यात

On: June 13, 2026 11:11 AM

जळगाव : जामनेर शहरातील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी जामनेर पोलिसांनी मध्यप्रदेशातील इटारसी येथून दोघांना ताब्यात घेतले आहे. प्राप्त माहितीनुसार जामनेर येथील एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेण्यात आले होते. याबाबत मुलीच्या आईने जामनेर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपासाची चक्रे वेगाने फिरवली.

तपासादरम्यान तांत्रिक माहितीच्या आधारे संबंधित मुलगी मध्यप्रदेशातील इटारसी येथे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांचे पथक इटारसी येथे रवाना झाले. या कारवाईत मुलीला इटारसी येथून ताब्यात घेत तीची सुटका करण्यात आली असून दोघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयीत आरोपींमध्ये अमीन खाटीक (वय ३१) व अक्रम शाह मोहम्मद शाह (वय २०, रा. जामनेर) यांचा समावेश असल्याचे वृत्त आहे. दोघांविरुद्ध अपहरणासह संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असून न्यायालयीन प्रक्रियेनंतर तिला कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास जामनेर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक मुरलीधर कासार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment