जळगाव – जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन अधिकृत आणि जैन स्पोर्ट्स अकादमी आयोजित जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा २०२६ यशस्वीरित्या पार पडल्या या स्पर्धा दिनांक ०३ ते ०५ जुलै २०२६ दरम्यान जळगाव जिल्हा क्रीडा संघाच्या बॅडमिंटन हॉलमध्ये घेण्यात आल्या होत्या या स्पर्धांमध्ये अनुक्रमे ०९, ११, १३, १५, १७, १९, वर्षे वयोगटातील मुले व मुली एकेरी व १३, १५, १७, १९ मुले व मुली दुहेरी व मिश्र दुहेरी, तसेच पुरुष आणि महिला खुला गट व ३५+ वर्षांवरील पुरुष आणि महिला एकेरी, दुहेरी व मिश्र दुहेरी या सर्व गटांचा समावेश होता.
या स्पर्धेमध्ये जळगाव, चाळीसगाव, भुसावळ, जामनेर, एरंडोल, पाचोरा, भडगाव, वरणगाव व चोपडा या तालुक्यांमधून १८३ खेळाडूंचा सहभाग नोंदविला होता. स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे खजिनदार आणि जैन स्पोर्ट्स अकॅडेमी चे क्रीडा समन्वयक श्री अरविंद देशपांडे, आंतरराष्ट्रीय खेळाडू श्रीमती वृषाली पाटील, प्रशिक्षक अतुल देशपांडे व मुख्य पंच श्रीमती दीपिका ठाकुर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे व मान्यवर अतिथींचा स्वागत किशोर सिंह यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. तसेच मान्यवरांच्या हस्ते विजयी व उपविजयी खेळाडूंना सुवर्ण व रजत पदक, क्रीडा साहित्य व प्रमाणपत्र देण्यात आले.
या स्पर्धेचे विजयी व उपविजयी खेळाडू पुढीलप्रमाणे आहे
*०९ वर्षा आतील मुली एकेरी*
विजयी – शनाया निलेश बोथरा
उपविजयी – अनुश्री विनोद पाटील
*११ वर्षा आतील मुले एकेरी*
विजयी – ऋत्विक प्रवीण खैरे
उपविजयी – अनय हेमंत पाटील
*११ वर्षा आतील मुली एकेरी*
विजयी – सुमिती ठाकुर
उपविजयी – तमन्ना सुरेश बसंदाणी
*१३ वर्षा आतील मुले एकेरी*
विजयी – दर्शिल राजकुमार मुनोत
उपविजयी – ऊर्जित उमेद रायसोनी
*१३ वर्षा आतील मुली एकेरी*
विजयी – तवस्मी वरून मोहता
उपविजयी – आरोही धीरज माहेश्वरी
*१३ वर्षा आतील मुले दुहेरी*
विजयी – दर्शील राजकुमार मनोज आणि ऊर्जित उमेद रायसोनी
उपविजयी – मितांश गुप्ता आणि युवराज सुराणा
*१३ वर्षा आतील मुली दुहेरी*
विजयी – सर्वेशा संदीप जोशी आणि आरोही धीरज माहेश्वरी
उपविजयी – बाकी स्वप्निल कोठारी आणि लक्ष्मी प्रमोद पाटील
*१५ वर्षा आतील मुले एकेरी*
विजयी – भावेश सुनील पाटील
उपविजयी – अनामय अमोल जोशी
*१५ वर्षा आतील मुली एकेरी*
विजयी – तवास्मी वरून मोहता
उपविजयी – स्निग्धा संजय पाटील
*१५ वर्षा आतील मुले दुहेरी*
विजयी – आरव अमित दुडवे आणि अनामय अमोल जोशी
उपविजयी – इंदर अग्रवाल आणि शिवा देवसरकर
*१७ वर्षा आतील मुले एकेरी*
विजयी – नैतिक राजेश शिंदे
उपविजयी – फाल्गुन राजेश पाटील
*१७ वर्षा आतील मुली एकेरी*
विजयी – ओवी अमोल पाटील
उपविजयी – पुनम ठाकूर
*१७ वर्षा आतील मुले दुहेरी*
विजयी – श्लोक विजय जगताप आणि फाल्गुन राजेश पाटील
उपविजयी – रजत प्रेमल पटेल आणि शंतनु शैलेश फालक
*१७ वर्षा आतील मुली दुहेरी*
विजयी – तवास्मी वरून मोहता आणि पूनम ठाकुर
उपविजयी – अनिका अमित चौधरी आणि स्निग्धा संजय पाटील
*१९ वर्षा आतील मुले एकेरी*
विजयी – वैभव विलास परदेशी
उपविजयी – उदित कुशल कुमार मुंदडा
*१९ वर्षा आतील मुले दुहेरी*
विजयी – वैभव विलास परदेशी आणि हिमेश पाटील
उपविजयी – रजत प्रेमल पटेल आणि फाल्गुन राजेश पाटील
*१९ वर्षा आतील मुली दुहेरी*
विजयी – आणि का अमित चौधरी आणि स्निग्ध संजय पाटील
उपविजयी – मीहीका अमित राजपूत आणि सयुरी अमित राजपूत
*१९ वर्षा आतील मिश्र दुहेरी*
विजयी – फाल्गुन राजेश पाटील आणि तवास्मी वरून मोहता
उपविजयी – उदित कुशल कुमार मुंदडा आणि अनिका अमित चौधरी
*पुरुष एकेरी*
विजयी – शुभम जितेंद्र चांदसरकर
उपविजयी – कौशिक प्रवीण बागड
*महिला एकेरी*
विजयी – वृषाली मिठाराम धांडे
उपविजयी – राधिका मुकुंद बऱ्हाटे
*पुरुष दुहेरी*
विजयी – कौशिक प्रवीण बागड आणि उमेर देशपांडे
उपविजयी – शुभम जितेंद्र चांदसरकर आणि चेतन शिवाजी वराळे
*मिश्र दुहेरी*
विजयी – कौशिक प्रवीण बागड आणि ओवी पाटील
उपविजयी – अंकित कोली आणि राजश्री पाटील
*३५ वर्षावरील पुरुष एकेरी*
विजयी – तनुज शर्मा
उपविजयी – अमित दुडवे
*३५ वर्षावरील महिला एकेरी*
विजयी – वृषाली मिठाराम धांडे
उपविजयी – अनिता ध्यानी
*३५ वर्षावरील पुरुष दुहेरी*
विजयी – विनायक बालदी आणि कीर्ती मनोज
उपविजयी – अतुल ठाकूर आणि चेतन वराडे
*३५ वर्षावरील महिला दुहेरी*
विजयी – सारंगा लोखंडे आणि वृषाली पाटील
उपविजयी – शितल भोसले आणि प्राची माहेश्वरी
*३५ वर्षावरील मिश्र दुहेरी*
विजयी – चेतन वराडे आणि वृषाली पाटील
उपविजयी – किशोर सिंह आणि अनिता ध्यानी
या स्पर्धांमध्ये मुख्य पंच म्हणून श्रीमती दीपिका ठाकुर व पंच म्हणून पूनम ठाकूर, शुभम जितेंद्र चांदसरकर, फाल्गुन पाटील, रजत पटेल, उदित मुंदडा, शंतनु फालक यांनी काम पाहिले. तसेच स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी जैन स्पोर्ट्स अकॅडमी चे प्रशिक्षक किशोर सिंह सिसोदिया यांच्या मार्गदर्शना अंतर्गत करण पाटील, देव वेद, अक्षय हुंडीवाले, श्लोक जगताप, जाजीब शेख, सुफ्यान शेख, कोनिका पाटील, देवदत्त अहिरे , नमन जैन , स्निग्धा पाटील, अंबिका साबळे, यांनी मेहनत घेतली. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन जैन स्पोर्टस अकॅडमी चे प्रशिक्षक किशोर सिंह सिसोदिया यांनी केले. या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंचे अभिनंदन जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष श्री अतुल जैन व सचिव श्री विनीत जोशी यांनी केले व विजेता खेळाडूंना पुढच्या होणाऱ्या महाराष्ट्र राज्य आंतर जिल्हा चषक स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.







