कै. विनायक निम्हण राज्य मानांकन कॅरम स्पर्धेचे पुणे येथे आयोजन

On: July 24, 2026 8:21 PM

जळगाव –  महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व कॅरम असोसिएशन ऑफ पुणे यांच्या मान्यतेने तसेच सोमेश्वर फाऊंडेशन आणि झेनेटिक स्पोर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने तिसऱ्या कै. विनायक निम्हण राज्य मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या पुढाकाराने ही स्पर्धा ७ ते ९ ऑगस्ट २०२६ या कालावधीत पुणे येथे आयोजित करण्यात आली आहे. ही मानांकन स्पर्धा सलग तिसऱ्या वर्षी आयोजित केली जात असून सनी स्पोर्ट्स किंग्डम, सनीज वर्ल्ड, पाषाण–सुस रोड, सुस लेन, मुंबई–पुणे बायपास हायवे जवळ, पुणे येथे  ही स्पर्धा पार पडेल.

पुरुष व महिला एकेरी दोन्ही गटांतील पहिल्या आठ विजेत्या खेळाडूंना मिळून ₹१,१०,००० इतकी रोख पारितोषिके प्रदान केली जातील. राज्यभरातील अव्वल आणि नामांकित कॅरमपटू या स्पर्धेत सहभागी होणार असल्याने अत्यंत चुरशीचे सामने पाहण्याची संधी क्रीडाप्रेमींना मिळणार आहे. स्पर्धेचे प्रवेश अर्ज महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून प्रवेश अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २२ जुलै २०२६ आहे. स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंनी आपल्या संबंधित जिल्हा कॅरम संघटनेमार्फत प्रवेश अर्ज सादर करावा.

यासाठी जलगाव जिल्हयासाठी मंज़ूर खान ९९७०६४७८६८, सैय्यद मोहसिन (राष्ट्रीय विजेता) 70206 73357 यांच्याशी संपर्क साधावा. ही माहिती महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे मानद सचिव अरुण केदार यांनी दिली असून जिल्हातील सर्व कॅरमपटूंनी या मानांकन स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन शाम कोगटा, नितिन बरडे व ॲड. रोहन बाहेती यांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment