बुलेट मोटार सायकलचे सुटे पार्ट चोरी करणाऱ्या दोघांना अटक

On: July 24, 2026 8:46 PM

जळगाव – जळगाव शहरातील जे. एम. पी. मार्केट समोरील गुजराथी गल्ली परिसरातील लक्ष्मी ऑटो गॅरेजमधून बुलेट मोटार सायकलचे जुने इंजिन, क्लच कव्हर, गिअर बॉक्स कव्हर, हेड, मॅग व्हील व शॉकअप पाईप असा एकूण तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी झाला होता. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि. क्र. २७१/२०२६ भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५ (अ), ३३१(१) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

जिल्हापेठ पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक अनिल वाघ यांच्या अधिपत्याखाली अधिकारी व अंमलदारांचे विशेष पथक या गुन्ह्याचा तपास करत होते. तपास पथकाने केलेल्या प्रभावी तपासातून मिळालेल्या गोपनीय माहिती, तांत्रिक पुरावे आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे भिमा अनिल पवार, आरती जितेंद्र गोपाळ या दोघांना ताब्यात घेण्यात आले. दोन्ही आरोपींकडे कौशल्यपूर्ण व सखोल चौकशी केली असता त्यांनी हा घरफोडीचा गुन्हा केल्याची कबुली दिली.

त्यांच्या ताब्यातुन दोन जुने बुलेट इंजिन, दोन क्लच कव्हर, दोन गिअर बॉक्स कव्हर, दोन बुलेट हेड, चार मॅग व्हील, दोन बुलेट शॉकअप पाईप असा एकुण तीस हजर रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक अनिल वाघ यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकातील पोहेकॉ किरण वानखेडे, तोरस मराठे, अजय अहिरे, पोकॉ कमलाकर बहुगुणे, सुभाष तडवी तसेच म.पो.कॉ. सोनाली चव्हाण या गुन्ह्याच्या तपासात सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment