रेकॉर्डवरील चोरट्याकडून चोरीची मोटार सायकल हस्तगत

On: August 5, 2026 10:09 PM

जळगाव : पोलिसांच्या अभिलेख्यावरील चोरट्याकडून चोरीची मोटार सायकल हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. जिल्ह्यात सतत वाहन चोरीच्या घटनांच्या तपासकामी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या अधिपत्याखाली पथकाची निर्मीती करण्यात आली होती.

पोलिसांच्या अभिलेख्यावरील अट्टल गुन्हेगार विभोर जुलाल जाधव हा त्याच्या कब्जात चोरीची मोटार सायकल वापरत असल्याची माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांचे पथक रावेर तालुक्यातील विवरे येथे रवाना झाले होते. त्याच्याकडे असलेल्या मोटार सायकल बाबत चौकशी केली असता ती चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्या ताब्यातील मोटार सायकल जळगाव मनपा पार्कींग परिसरातून चोरी करण्यात आली होती. याप्रकरणी जळगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला होता.

विभोर जाधव यास अटक करण्यात आली. त्याच्याविरुद्ध यापुर्वी घरफोडी व चोरी यांसारखे गुन्हे दाखल असून त्याचा इतरही गुन्ह्यांमध्ये सहभाग असण्याची शक्यता गृहीत धरण्यात आली असून त्या दृष्टीने तपास सुरु आहे. त्याला अधिक तपासकामी जळगाव शहर पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. अधिक तपास जळगाव शहर पोलिस स्टेशनचे हे.कॉ. नंदलाल पाटील करत आहेत.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलिस अधिक्षक संदीप गावीत, डिवायएसपी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वातील पोलीस उप-निरीक्षक सोपान गोरे, पोहेकॉ लक्ष्मण पाटील, पोना राहुल पाटील, पोकॉ जितेंद्र पाटील, भुषण पाटील, राहुल महाजन यांच्या पथकाने या कामगिरीत सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment