राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी

On: August 12, 2026 9:39 PM

जळगाव : हरित महाराष्ट्र अभियानांतर्गत जिल्हाधिकारी, जळगाव यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत गांधी रिसर्च फाउंडेशन, आणि जळगाव वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने अनुभूती निवासी स्कुलच्या पाठीमागील राखीव वनातील कक्ष क्रमांक ४०७ येथे वृक्षारोपण व सीड्स बॉल लागवड कार्यक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमात विविध प्रजातींच्या ५०० रोपांची लागवड करण्यात आली. तसेच करंज, कांचन आदी वृक्षप्रजातींच्या ३ हजार सीड्स बॉलची पेरणी करण्यात आली. वनक्षेत्रातील जैवविविधता वाढविणे, स्थानिक वृक्षप्रजातींचे संवर्धन करणे आणि पर्यावरण संरक्षणाला चालना देणे, हा या उपक्रमाचा उद्देश होता.

कार्यक्रमास जैन इरिगेशन च्या गार्डन व कृषी विभागाचे प्रमुख अजय काळे, संजय सोनजे, पर्सोनल विभागाचे राजेश आगीवाल, जैन इरिगेशनच्या वन व पर्यावरण विभागाचे राजेंद्र राणे, सहाय्यक वनसंरक्षक अमोल चव्हाण व अमोल पंडित, वनपरिक्षेत्र अधिकारी रामकृष्ण लामगे, क्षेत्रीय अधिकारी उमाकांत कोळी, हरिष थोरात, स्वप्निल गोसावी व संभाजी पाटील उपस्थित होते. गांधी रिसर्च फाउंडेशनचे फिल्ड ऑफिसर विक्रम अस्वार, डिव्हाईन गार्डन विभागाचे मयूर देशमुख, शुभम काळे, गोकुळ सपकाळे यांच्यासह चार स्थानिक महिला बचत गटांच्या सदस्या आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. मान्यवर, महिला बचत गटांच्या सदस्या व ग्रामस्थांच्या सामूहिक सहभागातून वृक्षारोपण आणि सीड्स बॉल लागवडीचे काम यशस्वीरीत्या पूर्ण झाले. या उपक्रमामुळे राखीव वनक्षेत्रातील जैवविविधता संवर्धनास हातभार लागणार असून, स्थानिक पातळीवर हरित महाराष्ट्र अभियानाला अधिक बळ मिळणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment