पतीचा खून – पत्नीसह अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा

On: August 13, 2026 10:13 AM

जळगाव : गहाण ठेवलेली मोटार सायकल सोडवण्याच्या वादातून पत्नीने अल्पवयीन मुलाच्या साथीने पतीचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटने प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्नीला अटक करण्यात आली असून अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. चाळीसगाव तालुक्यातील आंबेहोळ येथे ही घटना घडली.

करणसिंग रामसिंग वंजारी असे मृत पतीचे तर अरुणाबाई वंजारी असे संशयीत पत्नीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे मयत करणसिंग वंजारी यास मद्यपानाचे व्यसन होते. या व्यसनातून करणसिंग यांनी मोटार सायकल गहाण ठेवली होती. गहाण ठेवलेली मोटार सायकल सोडवण्यासाठी पैशाच्या वादातून पती पत्नीत वाद झाला. वाद विकोपाला गेल्याने अल्पवयीन मुलाने सायकलमधे हवा भरण्याचा पंप वडील करणसिंग यांच्या डोक्यात मारल्याचा आणी नंतर मायलेकाने मिळून त्यांचा नायलॉनच्या दोरीने गळा आवळून खून केल्याचा आरोप आहे. मंगळवारी दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटने प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment