भल्या पहाटेपासून जळगाव पोलिसांची ऑपरेशन 3/25 मोहीम

On: August 13, 2026 5:32 PM

जळगाव : आज भल्या पहाटेपासून जळगाव पोलिसांनी ऑपरेशन 3/25 ही विशेष प्रतिबंधात्मक मोहीम राबवली. पोलिस अधिक्षक डॉ. श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभुमीवर ही विशेष प्रतिबंधात्मक मोहीम राबवण्यात आली.

जळगाव जिल्ह्यात गेल्या दहा वर्षाच्या कालावधीत भारतीय शस्त्र अधिनियम अन्वये गुन्हे दाखल असलेल्या तसेच बेकायदेशीर अग्निशस्त्रांचा वापर करणा-या व गुन्हेगारी पार्श्वभुमी असणा-या व्यक्तींची माहिती संकलीत करण्यात आली होती. या माहितीच्या आधारे संबंधीत 24 गुन्हेगारांच्या वास्तव्यासह त्यांच्याकडे असलेल्या शस्त्रांसह वाहनांची अचानक पडताळणी करण्यात आली.

या मोहिमेअंतर्गत भुसावळ बाजारपेठ, वरणगाव, एमआयडीसी, स्थानिक गुन्हे शाखा, चाळीसगाव शहर आदी पोलिस स्टेशन हद्दीतील एकुण सात गुन्हेगारांविरुद्ध कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून एकुण सात गावठी कट्टे, अकरा जिवंत राऊंड, एक चाकू, एक तलवार, 25 मोबाईल, व तिन मोटार सायकल असा 7 लाख 19 हजार 600 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. संभाव्य गंभीर गुन्हे घडण्यापुर्वी वेळीच विशेष मोहीम राबवून जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकामी गुन्हेगारीविरुद्ध प्रभावी कारवाई सुरुच राहणार असल्याचे पोलिस अधिक्षक डॉ. श्रीकांत धिवरे यांनी म्हटले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment